पाठीवरती हात ठेवुनी फक्त लढ म्हणा....

साहेब मला तो दिवस आजही आठवतो ९ मार्च २००६ रोजी तुम्ही शिवसेनेशी उभी फारकत घेवुन महाराष्ट्र नवनिर्मान सेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या सर्वांगिन विकासासाठी, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे नेत्रुत्व घेवुन हे शिवधनुष्य लिलया पेलले. त्या नंतर मराठी जनमाणसांने ही तुम्हाला डोक्यावर घेवुन पहिल्याच निवडनुकीत पक्षाचे तेरा आमदार निवडुन आले महानगर पालिका निवडनुकित दोनशेच्या वर पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक झाले. नाशिक सारख शहराचे नवनिर्मान करण्याचे काम मतदार राजाच्या कृपेने आपल्या वाट्याला आले. साहेब तुमची काम करण्याची पध्दत, तुमचे सडेतोड विचार, तुमचा प्रामाणिकपणा, महाराष्ट्रा विषयी आसलेली तळमळ आम्ही जानतो आहोत. पण साहेब आपण पक्षाची स्थापणा केली ती अस्तानीतले निखारेच घेवुनच.. शेवटी हेच आस्तानीतले निखारे पुढे गद्दारच झाले तो भाग वेगळा आसो ज्यांनी गल्लीत कोणी विचारत नव्हते आसे आनेक पक्ष कार्यकर्त्यांना आज तुम्ही ओळख दिली हेच तुमच कर्तुत्व..आशा गद्दारांचा समाचार घ्यायला जनता सुज्ञ आहे.
            साहेब पक्ष स्थापणे नंतर तुम्ही मराठी माणसाच्या, मराठी आस्मिते साठी, महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राचा विकास आराखडा ( blue print) मांडला. आजपर्यत महाराष्ट्र विकासाचा येवढा मोठा आराखडा कोणत्याही राजकिय पक्षाने मांडला नव्हता.पण ती हिम्मत तुम्ही केली. आसो  त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडनुकीत पक्षाला मोठा पराभव स्विकारावा लागला,पक्षाच्या आमदारांची संख्या तेरा आमदार  वरुन एक वर आली आणि इथुच आस्तानित ले खरे निखारे कोण याची मनसैनिक आणि महाराष्ट्राला ओळख झाली. गद्दारांच्या कोलांटाउड्या सुरु झाल्या राज्यापासुन तर तालुकापर्यत आसे अनेक फेरीवाले मनसैनिकांनी पाहीले. पण संघटनेचा जा मुख्य गाभा आहे तो णनसैनिक आजुनही साहेब तुमच्या मागे ठाम पणे उभा आहे. आज नाशिकरांना ज्या विश्वासाने मनसेच्या हातात सत्ता दिली त्या विश्वासाला सार्थ ठरेल आसे नवनिर्माण आपण नाशिकमधे करुन दाखवले किंबहुन जागतिक पातळीवर त्या नवनिर्मानीची दखल घेतली. आर्थात हे नवनिर्मान तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली करीत आसतांना  शासकिय कंत्राटाच्या पावावर नजर आसनार्या बोक्यांना तुमच नवनिर्मान रुचलं नाही म्हणुन तीस नगरसेवक एकट्या नाशिकचे फुटले तरही तुम्ही त्याची पर्वा केली नाही आणि संपुर्ण महाराष्ट्रात भ्रष्ट्राचाराचा एकही आरोप नसलेली महानगरपालिका म्हणुन नाशिक महानगरपलिका घडवली.
    आज नाशिक सारख्या शहरात आपण मोठ मोठ्या उद्योगपतींच्या सी आर एस फंडातुन चांगले बगीचे उभारले, मोठे रस्ते निर्माण केले. जागतिक दर्जाचे बेटानिक गार्डन, नविन संकल्पना घेवुन  चिल्ड्रन ट्रफिक पार्क उभारले, गोदापार्क चे सुशोभिकर करुन नवनिर्माणाचा अदर्श पांयडा पाडला. पण मागच्या पुणे , मुंबई, ठाणे, नागपुर, महानगर पालिका निवडनुकित सत्तेत आलेल्या शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांनी शहरांचा विकास किती केला  याचा हिशोब जनतेला द्यायला हवा. हे झाले महानगर पालिकेतले पण राज्यात आणि देशात काय वेगळ सुरु आहे. नोटबंदी करुन देश आर्थिक दृष्ट्या मागे पडला आहे. मंदीचे संकट देशावर कायम आसतांना विकासाच्या नावावर रोज नव्या नव्या पुड्या सोडल्या जातात प्रत्येक निवडनुकीत मतदारांना गाजरे दाखवुन मतदारांचा फक्त भ्रमनिरास केला जातो. याच ताज उदाहरण कल्यान डोम्बीवली निवडनुकित कल्याण ला सहाशे कोटी रु विकास निधी दोण्याचे अश्वसन मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्यातला एक पैसा ही महानगर पालिकेत पोहचला नाही हे वास्तव आहे.
          आता पुन्हा एकदा निवडनुका लागल्या आहेत. शिवसेना भाजप मधला कलगीतुरा पुन्हा झाला आहे. शिसेनेने आपल्या निर्धार मेळाव्यात मागच्या अपमानाचा बदला घेत युती तोडण्याची घोषना केली आहे.  ही युती तोडत आसतांना उध्दव साहेबांनी जलिकट्टुच्या मस्तावाल बैलाचे उदाहरण देत भाजप च्या मस्तावाल बैलाला वेसन घालण्याचे धाडस दाखवले आसले तरी बैलाच्या शेपटीला धरत राज्यात आणि केद्रातल्या मंत्रीपद उपभोगत आहेत आसो हे वास्तव आसले तरी मराठी माणसाच्या हितासाठी व मराठी माणसाच्या मतात विभाग नको म्हणुन साहेब आपण  शिवसेनेसोबत युती प्रस्ताव मांडला, उध्दव साहेबांना फोन केले पण आजुन शिवसेने कडुन कोणताही प्रतीसाद येत नसेल तर, साहेब युतीचा विषय सोडुन द्या... निवडनुका येतात निवडनुका जातात.. हार जीत तर होत आसते... सध्या  आपला बँड पँच  सुरु आहे. हिच वेळ आहे मित्र कोण? शत्रु कोण? ओळखन्याची आसो, साहेब मराठी सन-उत्सव, मराठी संस्कृती, किंबहुना मराठी माणसावर जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा तुम्ही मराठी माणसा मागे ठाम उभे राहीले पुढे ही राहनार यात शंका नाही. आशा आहे मराठी माणुस ही या निवडनुकीत मनसे मागे उभा राहील.पण महाराष्ट्रातला मनसैनिक सदैव तुमच्या मागे ठाम उभा आहे. आजपर्यत एकटा लढलो पुढेही एकटा लढु कारण संघर्षात कार्यकर्ता घडतो आणि संघर्ष केलेला कार्यकर्ता निष्ठावान आसतो. आशाच निष्ठावंतांची फौज तुमच्या मागे सदैव उभी आहे. आगामी काळात मनसेच्या अंगावर येनार्याना शिंगावर घेण्याची धमक आजही मनसैनिकांनमध्ये आहे...साहेब तुम्ही  फक्त पाठीवरती हात ठेवुन .. लढ म्हणा...


जय महाराष्ट्र !!

आपला निष्ठावान मनसैनिक
प्रशांत गडगे


Comments

Popular posts from this blog

लोकशाही आणी मतदान !!

तरुणांचा राजकारनातील सहभाग !!

प्रेम, व्हँलेन्टाईन, आणि जनरेशन नेस्ट...