Thursday 25 August 2016

बियर शाँपीनां आवर घालनार कोण ??

शहापुर तालुक्यासमोर कायदा सुव्यवस्थेचे आनेक प्रश्न सध्या आवासुन उभे आसले तरी गांवा गांवाच्या नाक्यांनवर झालेल्या बियर शाँपी मुळे सध्या नागरीक त्रस्त झाले आसल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आघाडी शासनाच्या काळात उत्पादन शुल्क विभागाने गांव तिथे बियर शाँप संकल्पना  राबवत गांवा गांवात आधिकृत बियर शाँपींना परवानगी देवुन दारु व्यवसायाला राजमान्यता  दिली आहे पण यामुळे जरी राज्याच्या तिजोरी वाढ झाली आसली तरी समाजाच स्वस्थ बिघडले आहे आसे बोलले तर वागवे ठरनार नाही. आज काल नव्याने झालेल्या या बियर शाँपी मुळे गांवा गावात हौदोस घातला आहे. एक अखअकी पिढी बरबाद करण्याच काम या बियर शाँपी कडुन सुरु आहे. एकीकडे शासन बियर शाँपीना आधिकृत परवाने देत आहे तर दुसरी कडे व्यसन मुक्ती साठी लाखो रुपये खर्च करीत आहे आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणा मुळे कायदा सुव्यवस्थेवर चांगलाच तान येत आसल्याचे चित्र दिसत आहेत.
      गेल्या काही वर्षापासुन महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणिय वाढले आहे. यात चोर्या, दरोडे,खुन मारामारी, बलात्कार आशा घटनांनी वृत्तपत्रांची पाने च्या पाने  भरली जातात पण शासनव्यवस्थेवर याचा परीनाम होत नाही. आत्तात कोपर्डी बलात्कारा सारखी लाजिरवानी घटना महाराष्ट्रात घडली. त्या घडनेतील आरोपी बलात्कार करण्या पुर्वी भर चौकात आसलेल्या बियर शाँप वरच दारु पित बसले आसल्याच तपासात उघड झाले आहे. गांवा गावांच्या नाक्यांनवर बियर शाँपी झाल्याने आजच्या पिढीला दारु मिळवने अवघड राहीले नाही. त्यामुळे भर नाक्यावर महिलांची छेड काढनारे  किंवा गुंडागर्दी  करनार्या बेवड्यांच्या संखेत वाढ झाली आहे.
        आज शहापुर तालुक्या सारख्या आदिवासी तालुक्यात जिथे रस्ते विज  पोहचले नाहीत तिथे बियर शाँप पोहचले आहेत याच आश्चर्य वाटतंय. आसो पण शहापुर तालुक्यातील गुन्हेगारीत ही याच बियर शाँप मुळे वाढ झाली आसल्याचे काही पोलीसच खाजगीत सांगत आहेत. मटका जुगार बियर शाँपी या सारख्या समाज विघातक व्यवसाय राजरोज पण गांवा गांवाच्या नाक्यावर सर्रास सुरु आहेत. पोलीस ही चिरीमिरी घेवु या कडे काना डोळा करीत आहेत हप्तेबाज प्रशासन आणी सुस्त शासन यामुळे तरुणपीढी बर्बाद होत आहे. सगळेच नियम डावलुन या बियर शाँपी कुणाच्या आशिर्वादावर सुरु आहेत ? हे पडद्या आडचे हे खट शोधुन यांवर कारवाई करणे गरजेच आहे. हे बियर शाँप जो पर्यंत बंद होत नाही तो पर्यंत गुन्हेगारी कमी होनार नाही.देशाच्या लोकशाहीत लोंकांनी स्व: ता उठाव केल्या शिवाय हे बियर शाँप उखडुन फेकने शक्य नाही. त्या मुळे पुढच्या ग्रामसभेत या बियर शाँपी विरुध्द आवाज उठवला तर हे बियर शाँप उखडुन टाकने नक्की शक्य आहे.

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...