Friday 28 December 2012

गोष्ट एका खादाड बाबुची ...



शहापुर तालुक्यात खुप वर्षानंतर लाच लुचपत आधिकार्यानी छापा टाकुन गटशिक्षण आधिकार्याला 20 हाजार रुपयाची लाच घेतांना रंगे हात पकडुन अटक केली. आणि संपुर्ण शहापुरच हादरुन निघाले आर्थात हा हादरा इथल्या सगळ्याच सरकारी बाबुची झोप उडवनारा होता यांत काडी मात्र शंका नाही. सध्या भ्रष्ट्राचार हा राजशिष्टाचार झालायं , भ्रष्ट्राचारचे काळ भुत तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मानगुटीवर बसलयं, दिल्ली पासुन आमच्या गल्लीतल्या पारा पर्यत त्याचा जो नंगानाच सुरु तो एक दिवस देशाला घातक ठरनार आहे . आज लाखो करोडो रुपयांचे गफले आपल्याला सगळ्याच ठिकानी सर्रास पाहायला मिळतात त्यात फक्त विस हाजाराची लाच घेनारा एक महाभाग शहापुरात रंगे हात पकडला तर त्यात काय नवलं ? आशा दुर्देवी प्रतिक्रीया ऐकल्या आणि तळपायची आग डोक्यातच गेली, वर वर साधी वाटनारी ही घटना तशी खुपच गंभिर आहे , आद्याचे सुजान नागरीक घडवन्याची  जबाबदारी ज्या शिक्षण विभागाची आसते त्याच शिक्षण विभागातल्या गटशिक्षण आधिकार्याने चक्क एक शिक्षिके 20 हजार रु. लाच मागितली या शिक्षकाच्या पतीने वेळीच लाचलुचप विभागाकडे धाव घेवुन या माहाभागाला रंगेहात पकडुन दिले त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक ! पण शिक्षण विभागात आसा दुर्देवी प्रकार होणे हे आम्हा शहापुरकरांना शरमेची गोष्ट आहे.

    

                आज शहापुर तालुका झपाट्याने विकसित होत आहे . आता हे बदल जमिनी विकुन का सरकारी पातळीवर होत आहेत हा जरी चिंतनाचा विषय आसला तरी बदल होतोय हे वास्तव आपल्याला स्विकारावेच लागेल. आता बदल आला म्हणजे सरकारी कागद नाचनारच आणि आर्थात सरकारी कागद नाचवायचे म्हणजे सरकारी बांबुचा भाव वधारतोयच आज शहापुर मधली सगळ्याच सरकारी आँफिसेस मध्ये एकदा चक्कर टाकुनच बघा म्हणजे तुम्हाला कळेल या खादाड सरकारी बाबुचा भाव किती वधारलाय ते . रेशनिंग आँफीस पासुन ते रजिस्टर आफिस , पोलीस स्टेशन ते तहसिल कार्यालय सगळ्याच ठीकानी खादाड आणि मस्तवाल सरकारी बाबुची मस्ती आपल्याला पाहायलाच मिळते . किंबहुना लाच दिल्या शिवाय किवा लाच घेतल्या शिवाय कोणतेही सरकारी काम होतच नाही आसा शिष्टचार दुर्देवाने रुढ होतेय की काय आशी शंका येते . 5 रु. पासुन पाच लाख पर्यच ची लाच दिली आणि स्विकारली जाते हि आमच्या ग्रामीन भागातली व्यथा आहे . आज पंचायत समिती ग्रामपंचायत किंवा तहसिल कार्यलये हि तर भ्रष्ट्राचाराची उगमस्थाने आहेत जन्म दाखल्या पासुन ते जातपडताळनी दाखल्या पर्यत सगळे दाखले लाच दिल्या शिवाय क्वचितच मिळतात . त्यात गटशिक्षण आधिकार्याच्या लाच प्रकरणा मुळे इथल्या भ्रष्ट आधिकार्याना जरी धाक बसला आसला तरी आश्या कारवाया नेहमीच व्हायला पाहिजेत. त्यासाठी जनतेने पुढाकार घेने आवश्यक आहे. भ्रष्टाचर हा देशाला मारक आहे , जर उद्याच्या सुसंस्कूत नागरीक घडवनार्या शिक्षण खात्यात येवढा अंधार आसेल तर भावी पिढी काय प्रकाश पाडनार आहे याची कल्पना न केलेली बरी. भ्रष्ट्राचाराने आज कमालीचे टोक गाठले , तुम्ही प्रतिकार केला तरच भ्रष्ट्राचाराचे काळे भुत आपण संपवु शकतो, फक्त सुरुवात स्वःता पासुन करायला हवी .  भ्रष्ट्राचार निर्मुलनाची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे . दूष्ट्रीकोण बदला तर विचार बदलतात , त्याने केले म्हणुन मी करील ही प्रवृत्ती कुठे तरी थांबली पाहीजेत , स्वःताशी प्रामाणिक राहा .पैसा संपत्ती गाडी बंगला या गोष्टी पेक्षा नितीमत्ता महत्वाची !

        आज एका सरकारी बाबुच्या नितीमत्तेचा पर्दाफाश झालाय उद्या कदाचीत आसे आसंख्य खादाड मग्रुर मस्तावाल सरकारी बाबुचे काळे चेहरे उजेडात येतील फक्त तुम्ही आम्ही जागरुक राहीलो तर लाच देन आणि घेने हा ए प्रकारचा देशद्रोह आहे .  लाच मागणार्याना प्रतिकार केला तरच हे मस्तावाल बाबु ताळ्यावर येतील आन्यथा भ्रष्ट्राचाराचा मोकाट सुटलेला वळु भविष्यात तुम्हाला आम्हाला आवरने कठीन जाईल यात शंका नाही.�


Friday 21 December 2012

भांडवलशाहीः गुलामीचे डोहाळे



एकविसाव्या शतकात पदार्पण करुन एक दशक लोटले तरी आज आपल्या देशा पुढील आव्हाने आजुन काही कमी होत नाहीत. आणि आम्ही जगतिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहतोय, किती हस्यास्पद आहे ? वाढती लोकसख्या , बेकारी , भ्रष्ट्राचार , आत्याचार , एकंदरीत सगळ्या कायदेसुवस्थेचे बारा वाजलेत आसो या मागची कारणे शोधली तर एक मुख्य कारण आपल्या समोर येते ते म्हणजे, काँग्रेस सरकारची चुकीची धोरने आणि संकुचीत विचारसारणी. आणि याच मुख्य कारणा मुळे देशात काही वर्षात आराजकता माजेल यात शंका नाही .

    सध्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आर्थमंत्री आसतांना अँडाम स्मिथ च्या 200 वर्षापुर्वीच्या मुक्त भांडवलशाही आर्थव्यवस्थेचा स्विकार केला . आणि भारतात सरकारी उद्योगांच्या खाजगीकरणाचा पाया घातला. मुक्त भांडवलशाही म्हणजे 200 पुर्वी अँडाम स्मिथ ने  1776मध्ये वेल्थ आँफ नेशन्स नावाचा पाच खंडाचा ग्रंथ लिहला त्यात त्याने आसे म्हटले की प्रत्येक व्यक्ती स्वःताचे जास्तीत जास्त हित साधते प्रत्येक व्यक्तीला सरकारने अनिर्बंध मोकळी दिली तर प्रत्येक व्यक्ती आपले कमाल हित साध्य करील आणि आपोआपच समजाचे हित होईल. यात फक्त सरकारने कायदा सुव्यवस्था संभाळावी . वर वर मोहक वाटनार्या या मुक्त भांडवशाही आर्थव्यवस्थेने आगदी उलटे केले आणि संपुर्ण देशाचे वाट्टोळ व्हायची वेळ आली तरी सरकार आजुन झोपाच काढतयं का ? आज टाटा बिर्ला रिलायन्स सारखे भांडवल दार  देशातल्या सगळ्याच उद्योगांत मुक्त संचार करत आहेत . मानवी गरजा आसनार्या A TO Z उत्पदनात या बड्या उत्पकांची मक्तेदारी सुरु आहे

              या स्पर्धेत छोट्या छोट्या व्यापारी देशोधडीला लागले आहेत एंकदरी हा देश भांडवलदारांचा गुलाम होतो की काय आशी शंकेने सर्वसामान्य नागरीक बेजार झाला आहे. एकीकडे गँस पासुन रोशन पंर्यत सगळ्याच सेवा सुविधा सरकार नाकारत आहे . आणि एकिकडे भांडवल शहा जनतेची प्रचंड लुट करत आहे . आता या दुष्टचक्रातुन सुटका करण्या ऐवजी सरकार फक्त भ्रष्ट्राचार आणि स्वहित करण्यातच मशगुल आहे या पेक्षा दुर्देव ते कोणते पुढे काही वर्ष आसेच सुरु राहिलेतर आराजकता माजायला वेळ लागनार  नाही . जनता पिचत चालले आधारवड नाही, भविष्यात काय होईल, याची शाश्वती नाही. आशा भिषन परिस्थितीत देशाला सर्वनाशाचे डोहाळे लागले तर नवल काय ?       �


Tuesday 11 December 2012

कोंडीत अडकलेली सेना ...



बाळासाहेब गेले, आणि काही तसाचत बाळासाहेबांचा द्वेष करनारी मंडळीना त्यांच्या नावाचा लौकीक कमी करण्यासाठी राजकारनात सक्रीय झाली . बाळासाहेबांच्या चितेला आग्नि लागते न लागते तोच कुणी तरी वैयक्तीक अकसातुन बाळासाहेबांच्या स्मारकाची बोंब उठवली, भावनेच्या भरात शिवसैनिंकानी साहेबांच्या प्रेमापोटी हि मागणी लावुन आणि साहेबांन विरोधी नेहमीच कटकारस्थान करणार्या चाहटाळांना आयत खाद्य मिळाले. बाळासाहेबांच्या स्मरका वरुन चाललेला वाद आवघ्या महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी दुर्देवी आहे .

              इतिहासात जे जे विर पुरुष झाले मग ते छत्रपती शिवप्रभु आसो छत्रपती संभाजी आसो किंवा बाळासाहेब आसो काही ना काही वाद काढायचा आणि या आलौकीक व्यक्तीमत्वानां वादाचा काळा डाग लावायचा. तोच फासा साहेबांच्या निधनानंतर काही तासातच फेकला आणि बाळासाहेबांन सारखे वंदनीय कर्तुत्व ही त्यात बदनाम झाले या सारखे दूर्देव ते कोणते ? आसो साहेबांच्या निधनाने शिवसैनिकांचा मनोधैर्य खचले आहे त्यामुळे काही प्रतिक्रीया जरुर आल्या आसतील त्या फक्त भावना होत्या . आणि त्या डिचवल्या गेल्या म्हणुनच हा वाद झाला .उध्दव ठाकरेंनी आता या वादावर पडदा टाकला आणि तोच शिवाजी पार्क चा विषय आला त्या नंतर शक्तीस्थळ  हे सगळं चाललयं काय ?  बाळासाहेबांच्या जाण्याने सेनेत मोठी पोकळी तयार झाली आहे . उध्दव ठाकरे या धक्क्यातुन सावतात न सावरतात तोच त्यांना चारी बांजुनी विरोधकांनी घेरले आहे . सेनापतीच्या निधना नंतर सेना गाफील झाली का काय ? आसं दृष्य सगळी कडे दिसतय , आर्थात विरोंधकांच्या कोंडीत सापडलेली सेना आता मुत्सद्दी गिरीने वागून तुर्तास फक्त शक्तीस्थळाच्या मागे लागुन साहेबांचा आखेरचा विसावा चौथरा पहिल्यांदा अधिकृत करुन घ्यायचा मागे लागली पाहिजेत. नांमांतर आणि स्मारक थोड्या फुसतीने घेतले तर नक्कीच दोन्ही प्रश्न चुटकी सरशी सुटतील यात शंका नाही. एकाच वेळी दाहा मागण्याशी झुंजून शक्ती वाय घालवन्या पेक्षा एका मागणी वर ठाम राहा हा साधा नियम जरी सेनाने पाळला आर्धी लढाई इथेच जिंकेल आणि साहेबांची किंबहूना बदनामी न होता लौकीक काही आर्थाने तरी वाढेल आसे वाटले तर गैर नाही.

             

           आवघ्या माहाराष्ट्राने साहेबांनवर मनापासुन प्रेम केले त्यातलाच मी एक .साहेबांच्या स्मारकावरुन किंवा साहेबांशी संबधीत कुठल्याही गोष्टीवर काही फडतुस मंडळी वाट्टेल तशा प्रतिक्रीया देतात हे मनाला पटनारे नाही मनातली घालमेल कुठुन तरी व्यक्त केलीच पाहीजेत म्हणुन हा ब्लाँग प्रपंच. बाळासाहेंबाची सेना आणि शिवसैनिक सुज्ञ आक्रमक आहेत तेवढेच संयमी ही आहेत हा सयंम कायम ठेवा बस् !!          �


Tuesday 20 November 2012

भगव्या सुर्याचा आस्त ...





भगव्या सुर्याचा आस्त.....

बाळासाहेब एक नाव, नव्हते एक वयल होते.ज्याने संपुर्ण महाराष्ट्र व्यापला होता. गेली पाच दशके तमाम हिंदु आणि मराठी माणसाच्या ह्रदय सिंहासनावर आधिराज्य गाजवनारे हिंदुस्थान मधील एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब !! ज्यांच्या ऐवढी किर्ती क्वचितच कोणत्या नेत्याला मिळते. सत्ताधारी आसो वा विरोधक  नेहमीच त्यांना वचकुन आसायचे. त्यांच्या एका शब्दापुढे मोठे मोठे नेते नांगी टाकायचे येवढे आफलातुन नेते म्हणेजे एकच बाळासाहेब ठाकरे ! सुरुवातीच्या काळात बाळासाहेब एक व्यंगचित्रकार उदयाला आले पण मराठी भाषकांवर होणार्या आन्याला वाचा फोडनार्या व्यंगचित्रांना प्रसिध्दी न देनार्या फ्री प्रेस वृत्तपत्राला कायमची सोडचिठ्ठी देवुन त्यांनी 13 आँगस्ट 1960 मध्ये मार्मिक या साप्ताहीकाची स्थापना केली आणि तिथेच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एक नव्या संघर्षची नांदी झाली. किंबहुना एका भगव्या सुर्याचा उदय झाला. मार्मिक  मधुन प्रसिध्द होणारी व्यांगचित्रे ही प्रामुख्याने मुंबईतील मराठी माणसावर होणार्या आत्याचारावर आधारीत आसल्याने अल्पावधितच बाळासाहेब प्रसिध्दी झोतात आले. आणि इथुन पुढे थंड पडलेल्या, ग्लानी आलेल्या लाखो मराठी बांधवांना चेतवुन त्यांचा एका मोठा लढा उभारन्याचे शिवधनुष्य बाळासाहेबांनी पाच दशके लिलया पेललं आर्थात यामागे त्यांची महाराष्ट्रा प्रति आसलेली नितांत श्रध्दा आणि तगमग हीच खरी शक्तीस्थान बनुन सुरुवाती पासुन शेवट पर्यत त्यांच्या मागे भक्कमपणे उभी होती.

     दाक्षिणात्यांची मुजोरी दिवसेंनदिवस वाढत होती. याची चिड तर सगळ्याच मराठी बांधवाना येत होती पण या विरुध्द आवाज उठवनार कोण ? आणि आशा वेळी बाळासाहेबांनी मार्मिक मधून मराठी माणसाला आवाज दिला. आणि शेकडो तरुण पेटुन उठले याच पेटुन उठलेल्या तरुणांना बाळासाहेबांनी नेऋत्व दिले आणि 19 जून 1966 शिवतिर्थावर शिवसेनेचा जन्म झाला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आसो किंवा उठाव लुंगी बजावो पुंगी सारख्या अदोलानांनी आख्खा महाराष्ट्र पेटुन उठला तो आज मिती पर्यत शांत झालाच नाही हेच बाळासाहेबांचे मोठ यश.23 जाने 1989 रोजी सामना या वृत्तपत्राच्या माध्यमातुन त्यांनी आपला विचार आनेक शिवसैनिकांपर्यत आपला विचार नुसता पोहचवलाच नाही तर रुजवला देखिल.आपल्या आमोघ आणि प्रतिभाशाली वकृत्वाने त्यांनी लाखो लाखो जनसमुदायाच्या सभा आशा जिंकल्या. सभेला आलेल्या तरुणांना नेमके काय हवे याची नाडी ओळखुन बाळासाहेब अतिशय मार्मिक आणि शेळक्या शब्दात देशातल्या भल्या भल्या नेत्याचा आपल्या ठाकरी शौलीत खरपुस समचार घेत. आणि त्यांची हिच वृत्ती जनमासात प्रचंड लोकप्रिय झाली. पूढे त्यांच्या भाषनाचा कैफ आसाच वाढत गेला आणि दिवसागणित महाराष्ट्राचे बाळासाहेबांन वरचे प्रेम वृध्दिंगंत होत गेले यात शंका नाही.

    गेली पाच दशके बाळासाहेब शिवसेनाप्रमुख म्हणुण अवघ्या महाराष्ट्राच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान आहेत. बाबरी मशिद पाडनार्या शिवसौनिकांची जाहिर पाठ थोपाटनारे किंवा हिटलर चा समर्थन करणारे बाळासाहेब थोड्याच काळात आवघ्या देशातल्या हिंदुच्या गळ्याचले ताईत बनले आणि तिथेच त्यांना हिंदुह्रदयसम्राट हि उपाधी बहाल झाली. मराठी बरोबरच हिंदुत्वाला प्राधान्या देनार्या बाळासाहेबांनी पोटात एक आणि ओठात एक आशी भुमिका आल्या अयुष्यात कधीच घेतली नाही. पाकिस्थानला मुंबई खेळन्यास घातलेली बंदी आसो किंवा पाकधर्जिन्या पाकड्यावर केलेले थेट भाष्य आसो किंवा बांग्लादेशीघूसखोरांनवर घेतलेली भुमिका आसो या मुळे जागतिक पातळीवर देखिल बाळासाहेबांचे नाव आदराने घेतले जाई. यात नवल नव्हते.  जात पात विरहित राजकारण त्यात ही 80% समाजकारण आणि 20 % राजकारण हे सुत्र देवुन लाखो शिवसौनिक घडवनारा हा नेता काही निराळाच !!

बाळासाहेब एक झुंजार नेता वक्ता तर होतेच पण माणुस म्हणुण ते एक असामन्य होते .त्यांची तुलना कराची झालीच तर फक्त सुर्याशी होऊ शकते,आहो रात्र कधीही न थकता फक्त जनकल्याना साठी झटनार्या सुर्याप्रमाणे बाळासाहेब आजीवन झटत राहीले आखेरच्या श्वासा पर्यंत ते झटत होते..

त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी आनेक मित्र कार्यकर्ते शिवसैनिक जोडले जशी जशी वेळ वाढत गेली शिवसेनेचे तेज वाढत गेले.याच तेजातुन मग छगन भुजबळ, मनोहर जोशी, नारायन राणे, राज ठाकरे, उध्दव ठाकरे आसे आनेक द्गिज नेते जन्माला आले किंबहुना साहेबांनी ते घडवले! यातले काही एक निष्ठ राहीले काही फितुर झाले, पण बाळासाहेबांनी त्याची पर्वा कधी केली नाही. ते एका व्रतस्त योध्या प्रमाणे फक्त प्रामाणिकपणे लढा देत राहिले. आखेर 1995 मध्ये तो दिवस उजडला, शिवसेनेच्या तेजाने संपुर्ण महाराष्ट्र तळपु लागला .शिवसेनेचा भगवा ध्वज आखेर विधान सभेवर फडकला आणि बाळासाहेबांचे नेऋत्व सर्वमान्य झाले.आणि केवळ दुर्देव म्हणुण आवघ्या पाच वर्षात हे तेज कमी झाले आणि शिवसेनेच्या हातातुन सत्ता निसटली ती आज मितीपर्यत.. याच काळात साहेबांनी स्वःता घडवलेले नेते शिवसेनेला जय  महाराष्ट्र करीत विरोधकांच्या छावणीत दाखल झाले पण बाळा साहेबांची हिंम्मत खचली नाही एका धिरोद्दत्त योध्या प्रमाणे नाना अडचणीवर मात करीत ते लढत राहीले, कधी अप्तस्वकियांशी तर कधी विरोधकांशी यामध्ये ही त्यांचा ठाकरीबाणा कायम होता हे आपल्याला विसरता येनार नाही.

    बाळासाहेब एक रसायन होते . एका का ते बोलायला लागले की अपोआप रक्त गरम होई आणि माणुस चेतवुन उठे याच मुळे शिवसेनेत तरुणांचा मोठा सहभाग आहे . आज गावो गावी सेनेच्या शाखा चांगल्या काम करतात त्याची मुख्य प्रेरणास्रोत फक्त बाळासाहेब ! हळु हळु वय वाढत होते बाळासाहेबांच्या विचारांना नाही पण शरीरांना बंधने येत होती, पण त्याची पर्वा न करताच बाळासाहेब नेहमीच मैदान उतरुन विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याच वेगळच तंत्र त्यांना अवगत होते. जनमासांची नस आणि नस ओळखनारे बाळासाहेबांना आता स्वःताच्या प्रकृतीची शंका येत होती आणी आत्ताच्या दसरा मेळाव्यात त्यांनी हि खंत बोलुन ही दाखवली आणि तमाम हिंदुस्थान दुर्देव ती शंका खरी ठरली, आणि सलग चार दिवस मृत्युला झुंजत ठेवनारे बाळासाहेब काळाच्या स्वाधीन झाले. आपल्या 86 वर्षाच्या कारकीर्दीत एक राजनेता मुत्सद्दी सेनापती, द्राष्ट्रा नेता,  धुरंधर वक्ता, कुशल व्यंगचित्रकार, निर्भिड पत्रकार, आश्या आनेक पदव्या ज्याच्या पायाशी लोळन घालत होत्या. करोडो शिवसौनिकांच्या ह्रदयात ते मानाने विराजमान झाले होते.याची प्रचिती अवघ्या जगाला त्यांच्या अंतयात्रे वेळी आलीच आसेल .30 लाखाच्या जमावाने सअश्रु आणि शोक अनावर डोळ्यांनी त्यांना निरोप दिला . न भुतो नभविष्यात आसा नेता होणे शक्य आवघ्या महाराष्ट्राला बाळासाहेबांची पोकळी पुढची काही दशके नक्कीच जानवेल . जनमानसावर आपल्या कतुर्त्वचा वेगळाच ठसा उमटवन्यार्या एकमेव बाळासाहेब ठाकरे या तेजोवलयाला माझा त्रिवार मुजरा !!

आ. सरसेनापती हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याना सआश्रु नयनानी भावपुर्ण अदरांजली ।।     �

�

�


Friday 2 November 2012

जागर स्रीशक्तीचा !


आज एकविसाव्या शतकात आपण प्रवेश करुन

एक तप उलटले, आबला म्हणुन उपेक्षीत

राहिलेली स्री शक्ती आज सबला म्हणुन

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन सर्वच क्षेत्रात

आघाडी वर आहे , चुल आणि मुल

ही संकल्पना तर पुर्ण लयाला गेली आहे.

मागच्या काही वर्षात महीलांनी पुरुषांन

पेक्षा सरस कामगिरी करत यशाची नव नविन

शिकरे पार केली पण हे सगळं आसचं शक्य

नव्हते. त्यासाठी आनेक लढे उभारले गेले, लढले

गेले, त्यात सावित्री बाई फुले यांच स्थान

अग्रभागी आसेल, 1 जाने. 1948

रोजी त्यांनी मुलींन

साठी पहीली शाळा काढली आणि स्री शिक्षणासाठी पहिला मोठा लढा त्यांनी उभारला आणि पुढे

हा लढा यशस्वी झाला. सामाजिक आणि धार्मिक

रुढीनी बरबटलेल्या समाजात स्री फक्त उपभोग्य

आहे. चुल आणि मुल व्यतीरिक्त ती काहीच करु

शकत नाही हा समज

चुकीचा ठरला आणि आता काही दशकामध्येच

स्रीयांनी केलीली प्रगती किती दैदित्यमान आहे

यात शंका नाही.पण याची डावी बाजु पण आपण

निट पाहिली तर आजुन ही आंधारच दिसतो.

एकविसाव्या शतकात खुप

प्रगती झाली आसली तरी आजही वृत्तपत्रात

येनार्या बहूतेक बातम्या ह्या स्री वर

होणार्या अत्याचाराच्याच असतात , बलात्कार ,

विनयभंग , अत्याचार, मारहान,

या बातम्या स्वःताला महासत्ता म्हणवनार्या देशाला भुषनावह

आहेत का ? स्रीया आज सर्वच क्षेत्रात

अघाडीवर आहेत, पण

पुरुषी अहंकाराला त्यांना पावलो पावली सामोरे

जावेच लागते ! स्रीयांना आता 50% टक्के

आरक्षण मिळाले आहे त्यामुळे

राजकारणातही मोठा सहभाग आसेल पण

शहरी भाग वगळता ग्रामिन

भागातली स्री आजुनही थोडी मागासलेली राहीली आहे ,

हे भिषन वास्तव आपल्याला नाकारुन चालनार

नाही. आज शतके लोटली खुप बदल झाले, पण

स्रीचा स्रीशी चाललेला संघर्ष काय

संपला नाही. स्री भ्रुण हत्या ,हुंडाबळी,

ही त्याची ताजी उदा. लज्जास्पद आहेत.

आर्थात स्री भ्रुण हत्या सारख्या प्रकरणात

सबला झालेली स्री पुन्हा आबला केव्हा झाली हे

कळलच नाही.

प्रसंगी रणचंडीका होणारी स्री आज

पोटच्या गोळ्याला देखील डोळ्यात पाहत

नाही इतकी निष्ठुरता आली कुठून ?आसो इकडे

सरकार उपाय योजना करण्या मशगुल आहे आणि

एकीकडे स्री भ्रुण हत्येचे प्रमाण वाढचत चालले

आहे यावरुन सरकारचे गांभिर्य समजुन येते.

आजची स्री खरंच खुप प्रगत सुशिक्षीत

झाली पण समाजाची मानसिकता आजुन बदलत

नाही. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन

काम करताना देखील स्रीयांना आनेक शारिरीक

आणि मानसिक

गोष्टीचा सामना करावा लागतो पण

या सगळ्यावरच मात करीत

ती आजुनही परीस्थितीची झुंजतेच आहे.

आणि तिचा हा संघर्ष कधी संपेल

याची शाश्वती नाही.

आद्या स्री शक्तीची प्रणेती जिजावु माँसाहेब,

झाशीची राणी लक्ष्मी बाई, सावित्री बाई फुले ,

अनंदीबाई जोशी , इदिरा गांधी ,

सरोजीनी नायडु ,ते साधना आमटे,

निलीमा मिश्रा,लता मंगेशकर ते प्रतिभा ताई

पाटील आशा कित्येक

रणरागिनी नी स्री शक्तीचा इतिहास

स्फुर्तीदायी केला आहे .

या रणरागीनीच्या कामाची दखल तर

आवघ्या जगाने घेतली. पण

स्री शक्तीच्या आस्तित्वाची लढाई

आजुनही सुरुच आहे . एके काळची आबला आज

सबला बनुन सगळ्याच क्षेत्रात मोठ्या हिम्मतीने

वाटचाल करीत आहेत .

कधी तरी स्री शक्ती हिच देशशक्ती होईल

आणि जग पालथे घालील आणि इतिहास

तिची नोंद घेईल यात शंका नाही . पण स्रीयांन

समोरील आजची आव्हाने मोठी आहेत.

ती पेलवताना होणारी दमछाक आम्हाला कळते.

पण एक दिवस नक्कीच पुरुषी मानसिकता बदलेल

आणि त्याच

दिवशी स्री शक्तीचा खर्या आर्थाने जय होईल

याची खात्री वाटते .

आसो स्री चा चाललेला संघर्ष आजचा नाही.

युगा युगांपासुन तो सुरु आहे . पण

ही रणरागीनी कधी थकली नाही. का कधी तिने

परिस्थिती समोर गुढगे ही टेकले नाही . ती लढत

राहीली अविरत लढत राहीली, तिने

शिवाजी घडवला, तिने संभाजी घडवला, तिनेच

भगसिंग, आणि अंबेडकर घडवले, पण

तिचा स्वःताचा संघर्ष संपला नाही.

तिचा हा संघर्ष अविरत चालला आहे. आशा आहे

या शतकात तरी आता पर्यत फक्त कागदावरच

राहिलेली स्री पुरुष समानता खर्या आर्थाने

जनमानसात रुजवली जाईल. याच

स्री शक्ती ची ताकद खुप मोठी आहे .

समाजातील अनिष्ट रुढी पंरंपरा आज्ञान यामुळे

आज अनेक ठिकाणी महिलांना अनादर

केला जातो, पण सध्या जागतिक करणाचे वारे

वेगाने वाहत आहेत, शिक्षण

आणि तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्याने होत आहे,

ज्या प्रमाणे बदल सृष्टीचा नियम आहे. त्याच

प्रमाणे स्री कडे बघन्याचा सामाजाचा दृष्टीकोन

आता बदलु लागलाय. भविष्यात नक्कीच

आर्थिक. सामाजिक, राजकिय, वा इतर

कुठल्याही क्षेत्रा मध्ये स्री शक्ती अग्रेसर

आसेल यात शंका नाही , पण

स्री शक्तीचा हा जागर आसाच सुरु राहु द्या !

कदाचित याच जागरातुन

एखादी रणचंडी आवतरीत होईन आणि या पिचलेले

खिळखिळ्या झालेल्या लोकशाही नव

संजिवनी देईल आसा आशावाद

बाळगायला तुर्तास हरकत नाही.

हि दिवाळी आमच्या तमाम

वाचकांना हितचिंतकांना भरभराटीची आणि जावो हिच

सदिच्छा !!

Wednesday 24 October 2012

५००० आभार !!



आज लक्षवेध-वेध घडलेल्या घटनांचा या ब्लाँग चळवळीला एक वर्ष पुर्ण होतोय . आतिशय विषन्वय आणि क्रोधीत मनाने हा ब्लाँग सुरु केला होता . त्याला कारणे हि तसेच आहेत . आवती भवती घडनार्या घटनांनी व्यथित झालेला मनातल्या सतांपाला कुठे तरी वाचा फुटली पाहिजेत त्यासाठी वृत्तपत्रातुन बातमी, लेख, पत्रव्यवहार, आशा आनेक मार्गानी प्रयत्न तर सुरुच आसतो . पण कधी प्रत्यक्ष संवाद होत नव्हता आणि याच साठी हा ब्लाँग प्रपंच सुरु केला . रोजच्या धावपळीच्या जगण्यातुन जसा वेळ मिळत गेला तसा तसा विविध विषयांद्वारे आपल्याशी या ब्लाँग च्या माध्यमातुन संवाद कींवा आतल्या मनाची सुरु आसलेली घालमेल आपल्या समोर मांडन्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आणि बघता बघता आज एक वर्ष पुर्ण झाले ! आर्थात या एक वर्षात आनेक वाचकांच्या ओळखी झाल्या, चर्चा झाल्या ! पण या निगरगट्ट राजकारण्यान मध्ये काहीच बदल झाला नाही. उलट आजची परिस्थिती अजुनच वाईट झाली आहे आसो. या एक वर्षात सर्वच मित्र मैत्रिनीने खुपच प्रतिसाद दिला. त्यातही अर्वजुन सांगण्या सारखी गोष्ट म्हणजे कधीही वृतपत्र न वाचनारे आभ्यासा पलिकडे न पाहनारे आशा मित्रांनी ब्लाँग वाचुन दिलेल्या प्रतिक्रीया मनोबल उंचावनार्या होत्या. ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही देने लागते म्हणुन या शिकवनीतुन सतत मनाला एक नवीन उर्जा मिळते त्यातच वाचक मित्र मैत्रिनीच्या खंबीर पांढीब्या मुळे आजुन खुप काही करण्याची नवी उमेद नेहमीच मिळत राहीली ती चिरंतर आशीच मिळत राहो हिच सदिच्छा.


आपला स्नेहंकीत

प्रशांत जयवंत गडगे .


विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा ।।

  �


Monday 15 October 2012

सरकारी शिक्षणाच्या आईचा घो !

आत्ताच नव्याने शिक्षणाच्या आईचा घो नावाचा चित्रपट येवुन गेला . आपल्या शिक्षण वाभाडे काढनारे अत्यंत भडक आणि वास्तववादी चित्रन यात केले होते .आर्थात खंगलेल्या आणि पुर्ण मोडकळीस आलेल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेची आज दुरावस्ता कोणी केली हे सांगने न लागे. ग चा म माहित नसलेल्या कोडग्याच्या हाती शिक्षण व्यावस्था गेली आणि जे व्हायचं तेच झालं . सरकारी शिक्षण म्हणजे एक मोठा विनोद झाला आहे. आज आपण मोठ्या आभिमानाने म्हाणतो उद्याचा भारत आजच्या वर्गामध्ये शिकतो. किंबहूना सरकारने शिक्षणाचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरीकाला बहाल केला आहे. पण शिक्षण व्यावस्थेच काय ? या भारतात जन्माला येनार्या प्रत्येकाला मोफत शिक्षण दिल जाईल आशा बोंबा सरकार नेहमीच मारत आसते, पण आज निम्म्या हुन जास्त सरकारी शाळा बंद व्हायच्या मार्गावर आहेत. मध्ये मध्ये मी निशानी डावा अंगठा नावाची कांदबरी वाचली होती . तिच तंतोतंत चित्रन आज सर्वत्र पाहावयाला मिळते आहे. खाल पासुन वर पर्यत फक्त कागद रंगवले जातात. कागदी घोडे मोठ्या थाटात नाचवले जातात, अहवाल तयार केले जातात, पण कृती मात्र शुन्य. आज सरकारी शाळेत जा आणि तिथली परिस्थिती पाहा . शौचालय नाही मैदान नाही कुठे लाईट आहे तर कुठे छतच नाही. किबहूना तिन चार इयत्तेला एक शिक्षक आशी दुर्देवी आवस्था सरकारी शाळांची झाली आहे . आता कुठला सुज्ञ पालक आपल्या मुलाला सरकारी शाळेत खुशी खुशी ने पाठवेल का ? या मुळे खाजगी शिक्षण संस्थेचा वाळु मोकाट सुटला आहे. सरकायच्या याच उदासिन धोरणांचा फायदा घेवुन खाजगी शिक्षण संस्था चालकांनी देशातील नागरीकांची प्रचंड लुट सुरु केली आहे . आज एकीकडे सरकारी शाळा बंद पडत आहेत, तर दुसरी कडे खाजगी शिक्षण संस्थेत एडमिशय साठी वेटिंग लिस्ट आहे .सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार तर दिला पण ते शिक्षण आहे कूठे आसा प्रश्न सर्व सामान्या पडा आहे. आज जिल्हा परिषद महापलिकांच्या शाळेची अवस्था न विचारलेली बरी. यात शहरी भागातल्या शाळेत गरजे पेक्षा जास्त शिक्षक आणि खेड्यापाड्यात एक शिक्षका कडे 4/5 वर्ग किती  ही विसंगती त्यात शिक्षकाना शिकवने कमी आणि सर्वेची काम जास्त, आश्यातच तिथल्या विद्यार्थाच्या गुणवत्तेच तर विचारुच नका . फक्त हजेरी साठी मुल बोलवाची काही तरी थोड शिकवायची आणि सुटली शाळा ! त्यात आता सरकारी शाळेमध्ये 8वी पर्यत नापास करता येनार नाही आसा नविन नियम आलाय . काय म्हणनार आता या शिक्षणाला ? जर सरकारी शिक्षण प्रणाली आशीच सुरु राहीली तर इथले विद्यार्थी पुढे काय दिवे लावतील हे न सांगितलेलेच बरे !! त्यामुळे खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळेत विद्यार्थाची गर्दि वाढत आहे, आणि सरकारी शाळा बंद पडत आहेत. सरकारी शाळांची घसलेली पत पून्हा उजळन्या साठी सरकारी शिक्षण व्यावस्थेत बदल करणे गरजेचे आहे . पुढच्या काही वर्षात सरकारने यात काही अमुलाग्रह बदल घडवले नाही तर सरकारी शाळा बंद पडतील यात शंका नाही . आणि मोफत शिक्षणाचा डिडोंरा पिटनार्या शासनकर्ताच्या फोल पणा पुन्हा जनतेसमोर उघडा पडेल . पण यात सर्वसामन्य नागरिकांची होनारी अर्थिक पिळवनुकीचा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो !!    �


लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...